अबब…! चक्क ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी रस्ता नाही…

0
513

अबब…! चक्क ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी रस्ता नाही…

गावकऱ्यांचा संताप प्रशासनाचे दुर्लक्ष

 

कोरपना/प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत इरई गावातील ही समस्या आहे. इरई येथील गावकरी आजही ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करण्यासाठी पायदळ चिखल तुडवत जात आहे. यामुळे गावकरी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने गावकरी जनतेत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे.

याचे कारण असे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुद्धा इरई भारोसा रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही. कित्येकदा हा रस्ता मंजूर झाला. अनेकदा रस्त्यासाठी लागणारे साहित्य टाकण्यात आले. मात्र टाकलेली गिट्टी सुद्धा उचलून नेण्यात आली. पण मंजूर झालेला रस्ता कुठे जातो आणि टाकलेला मटेरियल का बरं उचलून नेला जातो…? हे कुणालाच माहीत नाही.

इरई येथे वर्ग 4 थी पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी भारोसा किंवा भोयगाव ला जावे लागते, ते पण चिखल तुडवत… लहान मुलांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे असा सवाल संतप्त गावकऱ्यांना पडला आहे. आतातरी प्रशासनाने याकडे सजगतेने लक्ष देऊन हा रस्ता बनवावा अशी मागणी स्थानिक जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here