ताडोबातील बेलारा गोंडमोहाळी गेटचा शुभारंभ

0
593

 

ताडोबातील बेलारा गोंडमोहाळी गेटचा शुभारंभ

विकास खोब्रागडे

चंद्रपूर /-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे उपसंचालक ( बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील पळसगांव वनपरिक्षेत्रातील येणाऱ्या बेलारा गोंडमोहाळी पर्यटन व पळसगांव गावतलावतील तलाव मध्ये बोटिंगचे आज नवीन वर्षाच्या दिनी गेट नव्याने सुरू करण्यात आला.आर एन थेमस्कर वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगांव यांच्या हस्ते उदघाटन आज पार पडले.यावेळी पळसगांव वनपरिक्षेत्र अधिकारी आर एन थेमस्कर , इको विकास समिती वनविभागाचे कर्मचारी, गावकरी व पर्यटक उपस्थित होते. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून गावातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल.वाघाची नेहमी दर्शन होत असल्यामुळे आणखी पर्यटकात वाढ होईल, पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना जैवविविधतेचा व वन्यजीवांचा अभ्यास करता येईल तसेच वन्यप्राणी दर्शनाचा आनंद घेवू शकतील.गाईड ना ट्रॅकसूट गाईड चे कपडेच्या सुद्धा वाटप करण्यात आले. यासोबतच नाईट सफारी सुद्धा पळसगांव गेटमधून सुरू झाली आहे.या माध्यमातून गावातील स्थानिक ३० ते ३५ बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे.यामध्ये जिप्सी, गाईड, टिकीट काउंटर, वॉचमन यांचा समावेश आहे. या गेटच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळणार आहे. अशा प्रकारे पर्यटन क्षेत्रातून व बोटिंग मधून अधिकाधिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा या मागील उद्देश असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी गाईड व गावातील नागरिक व पर्यटक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here