!!सृष्टी,चराचर आणि मानव!!

0
572

चंद्रपूर -राजूरा (विदर्भ) :- महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या तथा चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील राजूरा निवासी सविता संजय भाेयर यांनी स्रूष्टी ,चराचर आणि मानव हा एक लेख शब्दांकित केला असुन ताे आम्ही आज खास वाचकांसाठी देत आहाे !

पंच महाभूतांनी साकारलेले हे विश्वाचे विराट रूप, पृथ्वी , आकाश , जल , वायु , अग्नी , चंद्र – सूर्य , ताऱ्यानी भरलेले गगन , सप्त समुद्र, सप्त पर्वतानी घातलेला ब्रम्हांडाचा गोल म्हणजे… ‘ पृथ्वी ‘. चराचरात भरलेली जीव जंतू , कणाकणात भरलेले अनु – रेणू ,आकाशाचे शत्र करून बसलेली धरती, चंद्रा, सूर्याचा आरसा करून बघत बसली. पंच महाभूतांनी जन्माला येणारा हाडामासाचा पुतळा..त्यात सोहम रूप भरलेला आत्मा, ही मातीची काया..जेव्हा अनंतात विलीन होते ..तेव्हा ही नाशिवंत काया रिकामी पडते. मायाजाळात गुंतलेला मायेचा पाश तोडून , पंच महाभूताचे रूप अनंतात विलीन होते.आकाश , सूर्य – चंद्र , मेघ, ताऱ्यानी भरलेले सुंदर गगण, सृष्टी आणि चराचर , त्यात वास्तव्य करणारे मानव, प्राणी, पशू, पक्षी, वृक्ष – वेली, दऱ्या – खोऱ्या, पर्वत, झरणे , नदी, नाले …अश्या सुश्म रूपांनी नटलेल्या – सजलेल्या पृथ्वी तलावर महामाया ही रचनात्मक स्तिथ होऊन , जन्म – मृत्यूचा खेळ मांडून बसली . येणे आणि जाने, हा तिचा नित्य क्रम आहे. मृत्यू हा अटळ आहे, आणि आत्मा हा अमर , अविनाशी , कधीही नाश ना पावणारा. हे सर्व मातीचे पुतळे नाशिवंत होऊन , शेवटी मातीतच मिसळणार.

 

हा मायेचा बाजार , चार दिवसांचा मेळा. मद, मस्तर , लोभ, दंभ, अहंकार, इत्यादी विकारांनी ग्रासलेला , मी पणाचा बाणाच. मी म्हणजे काहीच नाही, मी कुणी नाही,शून्याच्या पलीकडील ब्रम्ह म्हणजे अंतरआत्मा , निश्चळ, निर्मळ, निराकार,निर्गुण, असा आत्मा अमर आहे. ही कधीही न विझनारी आत्मरुपी ज्योत अखंड तेवत राहते. ज्याप्रमाणे वस्त्र जुने झाले की, ते टाकून मनुष्य नवीन वस्त्र अंगावर परिधान करतो. त्याचप्रमाणे आत्मा देहाला त्यागून दुसऱ्या देहात प्रवेश करतो.हा आत्म्याचा नित्य नेम आहे. चौऱ्यांशीचे फेरे घेऊन, मायेचे जाळे अंगावर ओढून जन्माला आलेला नरदेह, लोभ, दंभ, अहंकाराने व्यापून वाऱ्यासारखा वाहू लागला. देवाने ज्याला देह देऊन, बुध्दी दिली, तोच मानव वासनेच्या डबक्यात बुडत असतो आणि निर्मात्याला दोषी ठरवत असतो. बऱ्या – वाईट कर्माच्या मानेवर तलवारीने घाव घालतो , स्वतःचे स्वतःच वाईट घडवून आणतो, आणि दोष मात्र नशिबाला देतो. चांगले कर्म करून नशीब बदलविता येते.अशक्य ते शक्य करण्याची टाकत, कठोर परिश्रमाने , प्रयत्नाने मिळविता येते. म्हणतात ना, “प्रयत्ना अंती परमेश्वर”. खरोखरच प्रयत्नांना जर कर्त्याव्याची जोड लावली तर , प्रयत्न सफल होऊन , यश पाठीशी उभे राहील. अनंत प्रयत्नांची फळे आपल्याला कर्तव्य पूर्तीनेच मिळत असतात. इंद्रियांचा मेळ करून मुठीत बांधल्यास , वाईट कर्म बाहेर पडून, चांगल्या कर्माची फळे आपल्या पदरात पडतात.

 

” मृगाचीये अंगी कस्तुरीचा वास, असे ज्यास पाशी त्यास नाही ठाव !

परिक्षावांत घेती इथे हाथ वटी ,

भारवाही मेले वाजता ओझे !”

मृगाला आपल्याजवळ कस्तुरी आहे , हे त्याचे त्यालाच कळत नाही, तो उगाचच ओझे वाहत असतो. पण जेव्हा परिक्षावंताला हे कळले, तेव्हा त्याने कस्तुरी काढून घेतली. इथे स्वतःलाच ओडखण्याची शक्ती नसेल , ज्ञान नसेल , तर आयुष्यभर अज्ञानाचेच ओझे वाहावे लागतात.

 

सर्व प्राण्यांमध्ये देवाने, माणसाला अधिक बुद्धिमान बनविले आहे, पण तोच मानव आता गर्विष्ठ झाला. स्वतःलाच श्रेष्ठ समजु लागला. रज, तम, सत्व गुणांनी बाधित झालेला मानव, विकारांच्या जाळ्यात गुंतून , माझं – माझं करून रजोगुनाला शरण जातो. क्रोधावर नियंत्रण न ठेवता , सुसाट चक्रीवादळाप्रमाणे वेगवान पडत सुटतो.

 

” कावळ्याला जरी हंसाच्या पंगतीत बसविले, तरी त्याला पंचपक्वाणाची रुची नसते. याचप्रकारे तमोगुणी मानवाला, सात्विक गुणांची गोडी कशी असणार. प्रत्येकांनी विवेक ठेवून, क्षमाशीलपणा धरीला पाहिजे. चंदन जोपर्यंत झिजनार नाही , तोपर्यंत त्याचा सुगंध कळणार नाही. जर चंदनाचे सुगंध कळले नाही तर चंदनाचे वृक्षही, बोरी – बाभळी व इतर वृक्षांमधे काय फरक उरणार. अशाचप्रकारे मानवाला स्वतःचे उत्तम गुण जोपर्यंत कळणार नाही..तोपर्यंत त्याला त्याची वेगळी ओळख मिळणार नाही, आणि अंतःकरणही शुद्ध होणार नाही.

 

म्हणूनच विश्वव्यापी जगत्रात्याला शरण जाऊन , जन्म जन्मांतरीच्या सत्कर्माने , पृथ्वीतलावरील, चराचर, मानव सर्वांनी आपले जीवन सार्थकी लावावे. असे केल्याने कर्माची फलश्रुती लाभत असते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here