*दारूबंदी करण्यासाठी युवकांनी केली प्रहार संघटनेची स्थापना*

0
420

*दारूबंदी करण्यासाठी युवकांनी केली प्रहार संघटनेची स्थापना*

समुद्रपुर :- *तालुक्यातील साकुर्ली गावामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून गावातील दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला होता गावातील युवकांनी याचा विरोध केला असता त्यांनाच धमक्या मिळाल्या असल्याने गावातील युवकांनी कित्येक दिवसापासून पोलिस प्रशासनाकडे दारूबंदीचा विषय मांडला होता परंतु पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे यावेळी साकुर्लि गावातील युवकांनी सांगितले परंतु गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची व देशी दारूची मोठ्याप्रमाणात विक्री होत आहे यातील कुठलाना कुठला तोडगा काढावा याकरिता गावातील युवकांनी प्रयत्न केले परंतु यातील कुठलाही तोडगा निघत नव्हता. या गावात एक प्रसिद्ध म्हणून मातेचे मंदिर आहे आणि याच गावात नवरात्र उत्सवामध्ये व इतरही दिवशी खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होतात परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी काहीच करत नसल्याने साकुर्ली गावातील युवकांनी प्रहारचे वर्धा जिल्हा प्रमुख जयंत तिजारे याच्या नेतृत्वात प्रहार संघटनेची कास धरली व प्रहार जनशक्ती पक्षाची शाखाची स्थापना करण्यात आली व यामधुनच गावातील दारु बंदी दुर करण्याचा निर्णय घेतला आहे असे गावातील युवकांनी सांगितले*.
*यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुर्व विदर्भ प्रमुख तथा रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे, वर्धा जिल्हा प्रमुख जयंत तिजारे, समुद्रपुर तालुका प्रमुख प्रमोद म्हैसकर, जिल्हा रुग्णमित्र विनोद खंडाळकर, तालुका प्रक्षिधी प्रमुख अमोल झाडे, प्रहार सेवक रवि घोटे,सेलु उप तालुका प्रमुख नितेश भोमले, नकुल तिमांडे,समुद्रपुर शाखाप्रमुख आकाश झाडे, गोविन्दपुर,शाखाप्रमुख प्रशांत मरकोडे,सांवगी शाखाप्रमुख रजत डंभारे, धोनोली शाखाप्रमुख अक्षय मुंजेवार,प्रहार सेविका माधवी नरड तथा नवनुयुक्त प्रहार संघटनेचे सर्व सेवक व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले व साकारली शाखेची कार्यकारिणीहि गठीत करण्यात आली*
*यावेळी शाखाप्रमुख विनोद भोमले, उपशाखा प्रमुख प्रविन देशमुख, सचिव काशीनाथ बावणे, रूग्णसेवक अमोल देशमुख, प्रसिद्ध प्रमुख मंगेश जोगे,संघटक गणेश शेन्डें, सदस्य : आशिष बावणे प्रफुल बावणे, उमेश देशमुख, रोशन देशमुख, कैलास जवादे, मंगेश शेन्डें, पंकज मुन,राजु बावणे, गजु शेन्डें, रवि कापटे, किशोर मेश्राम, गजु देशमुख, आकाश जोगे, प्रदिप शेन्डें या सर्वांवर शाखेची जवाबदारी सोपवण्यात आली* …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here