आवाळपूर हिरापूर मार्गावर भीषण अपघातात हिरापूर येथील वृद्ध जागीच ठार

0
2109

आवाळपूर हिरापूर मार्गावर भीषण अपघातात हिरापूर येथील वृद्ध जागीच ठार

मदतीचा मागणीसाठी हिरापूर वासियांचा चक्का जाम

 

 

नांदाफाटा : गडचांदूर कडून वणी जाणारा राज्य मार्ग दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून या मार्गवर अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. या मार्गवरील बिबी ते आवाळपूर व हिरापूर ते सांगोडा रस्ता अक्षरशः जीवघेणा झाला असून आज ट्रकच्या धडकेत एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. आज सकाळी 9:00 वाजतांच्या सुमारास कोरपणा तालुक्यातील आवाळपूर जवळील हिरापूर येथील बबन गोविंदा आत्राम वय 65 या वृद्धाचा आवाळपूर हिरापूर मार्गाच्या शिवारात ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतक व त्यांचा नातू प्रतिक रवींद्र आत्राम हे MH 34 BC 9054 क्रमांकाच्या टूव्हीलर ने हिरापूर कडून आवाळपूर कडे जाताना ओव्हरटेक करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या औरंगाबाद येथील ओम ट्रान्सपोर्टच्या मालकीचा MH 20 E 4122 क्रमांक असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात बबन आत्राम हे जागीच गतप्राण झाले तर त्यांचा नातू प्रतीक रवींद्र आत्राम वय अंदाजे 18 हा जखमी झाला. अपघाताचे वृत्त गावकऱ्यांना कळताच स्थानिक नागरिकांनी मदतीचा मागणी साठी आवाळपूर ते हिरापूर रस्ता अडवून धरत चक्का जाम आंदोलन सुरु केले.
गडचांदूर पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप व मध्यस्थी करीत सदर मार्ग वाहतुकीसाठी मोकळा कऱण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र नागरिकांनी मदत मिळेपर्यंत मृतदेह उचलन्यास नकार देत रस्ता अडवून धरला. सदर अपघाताचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वात गडचांदूर पोलिस करीत असून वृत्त लिहिपर्यंत नागरिकांनी आवाळपूर ते हिरापूर रस्ता रोखून धरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here