पट्टेदार वाघाने केली बैलांची शिका

0
552

पट्टेदार वाघाने केली बैलांची शिकार

विकास खोब्रागडे

नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथे २३ फेब्रुवारीच्या रात्री
पट्टेदार वाघाने गावाबाहेर दामोदर केशव ढोणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलांवर हल्ला करून जागेवरच ठार केले आणि १००मिटर दूर ओळत नेले .
वडसी हे जंगल व्याप्त भागाला लागून असलेले गाव असून या गावात नेहमीच वाघा ची वर्दळ असून दहशत आहे काल रात्री पासून पट्टेदार मोटा वाघ हा गावाच्या आडोश्याला दबा धरून बसला होता दामोदर ढोणे यांचा बैलाचा गोटा हा गावाला लागून बाहेर आहे ढोणे यांनी बैल काल सायंकाळी बांधले आणि घरी गेले मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गाव शांत झाल्यावर वाघाने गोट्यावर आक्रमण करीत बैलावर हल्ला केला आणि त्याला जागेवर ठार करीत 100 मिटर दूर ओढत नेले सकाळी बैल मालक ढोने बैलांना बाहेर काढण्यासाठी आले असता बैल जागेवर दिसला नाही झटपट झाल्याची चिन्हे दिसल्यावर व रक्त पडल्याचे दिसल्यावर त्यांना बैलाची शिकार झाल्याचे समजले तेव्हा त्यांनी शोध घेतला असता शंभर मिटर वर बैल दिसला सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वनरक्षक सोनुने व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आले ढोने यांचे फार मोठे नुकसान झाले असून अंदाजे 45 हजार रुपये किमतीचे बैल ठार झाले व त्यांची बैलाची धूर मोडली असल्यामुळे वनविभागाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here