कामगारांच्या मागण्याबाबतचे निर्णय जय भवानी कामगार संघटनेला विश्वासात घेवून घ्या!
‘तसे न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडु’ सुरज ठाकरेंनी दिला कंपनीला इशारा!

राजुरा । किरण घाटे : गेल्या एक महिण्यां पासून जय भवानी कामगार संघटना व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्यामध्ये अडीच हजार कंत्राटी कामगारांना च्या समस्या घेऊन सुरू असलेले शीतयुद्ध आता हळूहळू पेट घेत असल्याचे चिन्ह द्रूष्टीक्षेपात पडु लागले आहे.
आतापर्यंत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अावळपूर तथा इतर सिमेंट उद्योगांमध्ये मान्यता प्राप्त असलेल्या संघटनांना कंत्राटी कामगारांना बाबत कुठलेही महत्वाचे, आवश्यक व कामगार हिताचे निर्णय घेण्यांस असमर्थता दाखवित गेले आहे. यूवा नेते सुरज ठाकरे हे गेल्या महिण्यांभरांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांच्या मागण्यां बाबत आंदोलनाविषयी आज ही ठाम आहे. नुकतेच खासदार बाळा धानोरकर यांच्या मध्यस्थीमुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. याच दरम्यान जुन्या प्रस्थापित कामगार संघटनांनी देखील दिवाळीचा योग साधून कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत पत्रकार परिषद घेतली व कामगारांबाबत लवकरच प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ असे सांगितले यामुळे सूरज ठाकरे हे चांगलेच संतापले असुन त्यांच्यासोबत असलेले शेकडाे कंत्राटी कामगार आपला आवाज आवाज आंदाेलनासाठी करीत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. असे चित्र आज पर्यंत कामगार क्षेत्रांमधील प्रस्थापित युनियनने कंत्राटी कामगारांना बाबत कुठलीही भूमिका घेतली नसल्याने आता अकस्मिकरित्या कंत्राटी कामगारांचा पुळका प्रस्थापित युनियनला कसा का येतो? असा खडा सवाल देखिल सूरज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधित्व त्यांची जय भवानी कामगार संघटना ही सातत्याने करीत असून सदरहु संघटनेच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतलेला कुठलाही निर्णय हा मान्य नसल्याचा इशारा त्यांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवळ पुर यांना दिलेल्या एका (निवेदन) पत्रकात केला आहे. या संदर्भात अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व त्या नंतर कामगार वर्ग काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.