विज कंत्राटी कामगारांच्या महत्वपूर्ण प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दुर्गापूर येथे भव्य मेळावा

0
724

विज कंत्राटी कामगारांच्या महत्वपूर्ण प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दुर्गापूर येथे भव्य मेळावा

 

चंद्रपूर, 22 एप्रिल : महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या विद्यमाने 19 तारखेला कामगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन कामगार नेते तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष भूषण भाऊ फुसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बंडु हजारे हे होते.

 

मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष महोदय नचिकेत मोरे, केंद्रीय जनरल सेक्रेटरी पावर कंत्राटी कामगार संघटना हे होते. मुख्य मार्गदर्शक भाई चैनदास भालंबर, केंद्रीय अध्यक्ष रोजंदारी मजूर सेना, प्रदीप ढाले, केंद्रीय सरचिटणीस पावर कंट्र., रोशन गोस्वामी, राज्य सचिव पावर कंट्र., निताई घोष, सचिव जनरल वर्क युनियन जि. चंद्रपूर, वामन बुटले अध्यक्ष जनरल लेबर युनियन विदर्भ रिझन नागपूर (सी.दु), सोमेश्वर सोरते साहेब महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघ, सदानंद देवगडे अध्यक्ष रोजंदारी मजूर सेना, अरुण नाकट भारतीय कंत्राटी कामगार सेना, सुभाश सिंह बावरे रोजंदारी मजूर सेना, बंडू मडावी, संजय ठाकरे, प्रदीप पाटील म.रा.बं.का. संघ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 29/02/2022 च्या मिटींगमध्ये जाॅब सेक्युरीटी बद्दल घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
सुनिल मोढवे व सुशांत गायकवाड, मुंबई कंत्राटी कामगार यांच्या अथक परिश्रमामुळे व यांनी केलेल्या सिफारसीनुसार 30ः, 35ः व 40ः टक्के कंत्राटी कामगारांना घरभाडे भत्ता लागु करावा.
सेवानिवृत्त कामगारांना महाजनको व कंत्राटदारांना तर्फे त्यांच्या केलेल्या सेवेनुसार 10 लाखाचा मोबदला देण्यात यावा.
कंत्राटी कामगारांना ए.एम.सी. कंत्राटमध्ये कामगारांना 1 वर्षाचा गेटपास देण्यात यावा.
अशाप्रकारे कामगारांच्या महत्त्वपुर्ण मागण्या होत्या.

 

मेळाव्यामध्ये कामगारांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्यावरती ठराव घेण्यात आले. मेळाव्याला 500 महिला कामगार व पुरुषांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज मैद यांनी तर प्रमोद कोल्हारकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here