शासकीय इमारती साठी जागा उपलब्ध करून द्यावे

0
539

शासकीय इमारती साठी जागा उपलब्ध करून द्यावे

सभापती अल्का आत्राम यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाला निवेदन

रुपेश मंकिवार पोंभुर्णा प्रतिनिधी

केमारा ग्रामपंचायत अंतर्गत केमारा,देवई व भटारी येथे गुरांच्या चराईसाठी  जागा नसल्यामुळे तसेच विविध योजनेतून शासकीय इमारती मंजुर झाल्या आहेत. त्या इमारती बांधकामांसाठी प्रस्थापित जागा उपलब्ध नसल्यामुळे त्याचे बांधकाम सुरू झाले नाही त्यामुळे इमारत बांधकाम साठी व गुरेढोरे यांच्या चराईसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी सभापती अल्का आत्राम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांना निवेदनातून केली आहे.

केमारा हे गाव जंगलात वसलेले आहे त्यामुळे गावाभोवती हे वनविभागाची जागा आहे.शासनाने गावात शासकीय  इमारती मंजुर केल्या आहेत त्या इमारती बांधकामांसाठी जागा नसल्यामुळे बांधकाम प्रलंबित आहे त्यामुळे सदर बांधकामांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावे तसेच गावात अनेक पशुपालन आहेत त्यांना आपले गुरेढोरे चराईसाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे गुरांच्या चराईसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना केमारा येथील सरपंच सचिन पोतराजे ,प्रेमदास ईष्टाम,बापुजी शेडमाके, प्रशांत मंडरे, अविनाश ढोंगे आदि गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here