शरदचंद्र पवार यांच्या जन्मदिवसा निमित्त सत्कार तथा भेटवस्तू देत जन्मदिवस केला साजरा

0
563

शरदचंद्र पवार यांच्या जन्मदिवसा निमित्त सत्कार तथा भेटवस्तू देत जन्मदिवस केला साजरा

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा जन्मदिवस गडचांदुर नगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सूरवात पवार यांचा वाढदिवस प्रोजेक्टर च्या माध्यमाने लाईव्ह कार्यक्रम (व्हरच्युल रेली ) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांना दाखविण्यात आला. जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूरच्या वतीने विविध सत्कार, भेट वस्तू, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
आदरणीय शरद पवार यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा अश्या अनेक स्तरावर कार्य अतुलनीय आहे. ८१ वर्ष पूर्ण होऊन ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. साहेब, शतायुषी व्हा! ही सदिच्छा सर्व राष्ट्रवादी प्रेमी सोबतच पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या समाजबांधवांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात विशेष सत्कार म्हणून नीट परीक्षेत 720 पैकी 710 मार्क्स घेऊन भारतात 38 वा क्रमांक प्राप्त केलेल्या अनिरुद्ध नानाजी डाखरे यांचा सत्कार सोबतच 34 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार, गरजू लोकांना ब्लँकेट भेट, होतकरू विद्यार्थी मेश्राम याला आर्थिक मदत देन्यात आली.
सन्मानचिन्ह स्मृतिशेस सुरेशराव जोगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शरद जोगी उपनगराध्यक्ष नगर परिषद गडचांदूर यांच्या तर्फे तर शाल व श्रीफळ अरूण निमजे विधानसभा अध्यक्ष राजुरा यांच्या तर्फे देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके, पिदुरकर, कुसळे, अरुण निमजे, शरद जोगी, प्रविण काकडे, सुनिल अरकीलवार, कल्पणा निमजे, मीनाक्षी एकरे, अश्विनी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करणसिंग भुराणी, प्रविण मेश्राम, मुनीर शेख, अशोक बोधे, पद्माकर बडूरे, सूरज जुनघरे, अभिषेक तुरानकर, मयूर एकरे, प्रविण कोल्हे, मंगेश तिखट, सदानंद गिरी, आकाश वराटे, अरविंद वाघमारे, अजय किन्हेकर तथा सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूर यांनी सहकार्य केले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here