चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे सुरु असलेल्या शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा

0
408

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे सुरु असलेल्या शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा

यंग चांदा ब्रिगेडची मागणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना निवेदन

 

 

 

चंद्रपूरातील वाढत्या उन्हेचा पारा लक्षात घेता शाळांना उन्हाळी सुट्टया जाहिर करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना केली असून सदर मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहराध्यक्ष कौसर खान, दुर्गा वैरागडे, चंद्रशेखर देशमुख, राम जंगम यांची उपस्थिती होती.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा हा उष्णतेसाठी जगात प्रसिध्द आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहे. त्यातच जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर व जिल्ह्यातील इतर शहरात होतांना निदर्शनास येत आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने नागपूर जिल्ह्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. असे असतांना जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना मात्र अद्यापही उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. सकाळची शाळा असली तरी सुध्दा मुले घरी येतपर्यंत दुपारचे 1 वाजतात आणि त्याच वेळेत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने १५ वर्षाखालील मुलांना त्याचा जास्त त्रास होत आहे.

 

सद्यस्थितीत उष्माघाताचे प्रमाण वाढून त्यात अनेकांचे बळी गेले आहे. अशात उष्माघाताचे नाहक बळी लहान मुले ठरणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे याचा गांभिर्याने विचार करुन चंद्रपूरातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here