जिल्ह्यात आतापर्यंत 12799 बाधित झाले बरे

0
233

जिल्ह्यात आतापर्यंत 12799 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 165 नव्याने बाधित ; दोन बाधितांचा मृत्यू

उपचार घेत असलेले बाधित 2904, जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 15937

चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 165 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 937 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  129 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 799 झाली आहे.  सध्या 2 हजार 904 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 20 हजार 924  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 3 हजार 640 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यु झालेल्या बाधितांमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील 62 वर्षीय पुरुष व चिमूर शहरातील गांधी वार्ड येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 234 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 219, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सहा, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 92 पुरूष व 73 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 56 बाधित, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील 9, मुल तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील 12, ब्रह्मपुरी तालुक्यातील सात, नागभीड तालुक्यातील 18,  वरोरा तालुक्यातील सहा, भद्रावती तालुक्यातील 22, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील सहा, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील  सहा असे एकूण 165 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील घुटकाळा वार्ड, कृष्णनगर, इंदिरानगर, तुकुम, दत्तनगर, वडगाव, रामनगर, सिव्हिल लाईन, बालाजी वार्ड, बाबुपेठ, ऊर्जानगर, बापट नगर, आयुष नगर, शास्त्रीनगर, घुग्घुस, भानापेठ वार्ड, महाकाली वार्ड, जीएमसी परिसर, बंगाली कॅम्प, गौतम नगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:

कोरपना तालुक्यातील काडोली, गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर एक, वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 11, वार्ड नंबर 14, राजगड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी,विहीरगांव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, काचेपार, नांदगाव परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील तलोढी, मुसाभाई नगर, सोनुर्ली, किटाळी, बाळापुर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, संत रविदास चौक, गुजरी वार्ड, विद्यानगर परिसरातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, अभ्यंकर वार्ड, आनंदवन परीसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील पिपरबोडी, सुर्या मंदिर वार्ड, लक्ष्मी नगर, पंचशिल नगर, सुमठाणा, सुरक्षा नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विवेकानंद वार्ड भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तलोढी, पंचशिल वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील भरपायली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमुर तालुक्यातील पिंपळनेरी, शंकरपूर, आष्टी परिसरातून बाधित ठरले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here