चेकविठलवाडा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात

0
2220

चेकविठलवाडा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू तिनं जण जखमी

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

गोंडपीपरी तालुक्यातील चेकविठलवाडा (तांडा) मार्गावर दि.२४ बुधवारी दुपारी वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकली MH 34 T 4377,MH 33 L 7706 एकमेकांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बंडू भाऊजी गदेकर वय (४५) रा.गंगापुर टोक तालुका पोंभुरणा हे जागेवरच ठार झाले. ते काही कामानिमित्त भं तळोधी येथे जात होते आणि वाटेतच अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अपघातग्रस्तांची स्थिती गंभीर आहे. या अपघातात उर्मिला वेणूराज चिताळे, आशा अंकज कस्तुरे, अंश दिवाकर कस्तुरे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी गोंडपिपरी पोलिस दाखल होऊन जखमींना उचारासाठी रुग्णालयात नेले असून. पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कातकर,पानेकर,शंकर मने,विलास कोवे,अनिल चव्हाण,अमित गुरनुले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here