मनुस्मृती दहन म्हणजे प्रतिकात्मक दहन नसून भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा क्रांतीकारक दिवस आहे…

0
448

मनुस्मृती दहन म्हणजे प्रतिकात्मक दहन नसून भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा क्रांतीकारक दिवस आहे…

 

 

महाड जवळील एका गावात 25 डिसेंबर 1927 रोजी एक परिषद चालू होती.ती संपताना महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ‘जो धर्म आम्हाला माणूस म्हणत नाही, तो आम्ही का पाळावा?’
उत्तरादाखल परिषदेत मनुस्मृती दहनाचा ठराव संमत करण्यात आला. याप्रमाणे प्रतीकात्मक पद्धतीने मनुस्मृतीची होळी केली. प्रतीकात्मक दहन म्हणजे केवळ जाळणेच नव्हे तर भारतातील स्त्रियांना मुक्त करण्याचा तो क्रांतिकारी दिवस होता, कारण त्याचे नेतृत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे होते…!
२५ डिसेंबर १९२७ सायंकाळी ४.३० वाजता परिषद सुरु झाली. स्वागताध्यक्षाने भाषण दिले व नंतर अध्यक्षिय भाषणासाठी बाबासाहेब उभे झाले. ते उभे राहताच संपुर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला, ‘बाबासाहेब आंबेडकरकी जय’ अशा घोषणा झाल्या अन बाबासाहेबानी माईक हातात घेऊन व भाषणास सुरुवात झाली. आता मात्र सगळया मंडपात एकदम शांतता पसरली. बाबासाहेब बोलु लागले, सत्याग्रही त्यांचा एक शब्द साठवु लागले.!!
“सनातन्यानी अमानुषपणाचा कळस गाठला आहे. गुरा ढोराना जे पाणि मिळते त्याला स्पर्श करण्याचा आम्हाला अधिकार नाही, हि अस्पृश्यता आता आपणच धुवुन काढायची आहे. खरंतर या चवदार तळ्याचे पाणि न प्याल्याने आम्ही मरणार नाही. आज पर्यंत आमचे अडले नाही किंवा अडणारही नाही. ते पाणि पिऊन आम्हाला अमरत्व प्राप्त होईल असेही नाही. पण आम्हाला तिथे अटकाव घालण्यात येतो तो अटकाव तोडायचा आहे. आमच्या मुलभुत अधिकारावर जी गदा आली ती घालवायची व हक्क बजावायचा म्हणुन हि सगळी धडपड चालु आहे. या लोकानी आम्हाला माणुस म्हणुन स्विकारावे व तळ्याचे पाणि आम्हास खुले करावे हिच आमची मुख्य मागणी आहे. हि सभा समतेची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी बोलावली आहे. आता समतेचे वारे देशाच्या काना कोप-यातुन वाहु लागले आहे. जिकडे तिकडे अस्पृश्य बांधव पेटुन उठले आहे. आम्हाला फार दिवस अटकाव करता येणार नाही…अटकावाच्या विरोधात जी शक्ती एकवटु लागली आहे त्याचा अंदाज घेताला आहे. हि शक्ती अटकावाचे सगळे बांध तोडुन सारं देशाला आपल्या प्रवाहाच्या कवेत घेऊनच थांबणार आहे. प्रवाहाचा वेग, अन भावनांचा उद्रेक असा खडबडत निघणार की सा-या सनातनी प्रथा त्या महापुरात बुडुन दम तोडतिल. महाड नगरपालिकेनी मणुष्य जातिला काळीमा फासणारा ठराव पास करुन एक अमानुष निर्णय घेतला आहे. आता याच भुमित सनातनी आत्याचार परतवुन लावण्याची शपथ घेऊया अन कुठल्याही किमती आपला मुलभुत अधिकार मिळवुनच दम घेणार असा निर्धार करुया.” अशा प्रकारे बाबासाहेबांच भाषण झालं व सगळा समाज पार न्हाऊन निघाला होता. नव्या दिशा दिसु लागल्या, आता अंधारातुन बाहेर पडण्याची आशा जागी झाली. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याच्या दिशेनी मार्गक्रमन चालु झाले. भविष्यातिल आंदोलनाच्या उग्रतेची हि नांदी होती… त्यानंतर मणुष्य जातिला काळीमा फासणारी व असमतेचा पुरस्कार करणारी धर्मचोपडी मनुस्मृती, या मनुस्मृतीने आमच्या समाजाच्या कित्तेक पिढ्या भस्म केल्या होत्या. आज मनुस्मृतीला भस्म करण्याचा दिवस होता. श्री. सहस्त्रबुद्धे यानी मनुस्मृती नावाचा सनातन्यांचा ग्रंथ दहन करण्याचा ठराव मांडला. राजभोज यानी या ठरावाला आपला पाठिंबा दर्शविला.
बहुमताने मनुस्मृती दहनाचा ठराव संमत झाला.

मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिषद मंडपाच्या पुढे एक खड्डा खोदण्यात आला. लोकानी मनुस्मृतीच्या काही प्रती गावातुन विकत आणल्या. कित्येकाना याची आधिच माहिती मिळाल्यामुळे प्रती सोबत आणलेल्या होत्या. शेवटी रात्री ९ वाजता मनुस्मृतीच्या प्रती खड्ड्यात टाकण्यात आल्या व एका बैराग्याच्या हाताने मनुला आग देण्यात आली. मनुस्मृतीला पेटविल्यावर जोरात घोषणा सुरु झाल्या. अख्या मंडमात जल्लोष होता. मनुचा अशा प्रकारे जाहीर दहन करुन अस्पृश्यानी आपण असले जातियवादी नियमाना भिक घालत नाही व समतेची कास धरली आहे याचा संदेश उभ्या भारताला दिला. खरं तर १९२६ मधे एक वर्षा आधी मद्रास प्रांतामधिल ब्राह्मणेत्तर नेत्यानी मनुचे जाहिर दहन केले होते. पण त्या दहनात अन या दहनात बराच फरक होता. ईथे थेट समाजाच्या सगळ्यात उपेक्षीत व मनुने ज्यांच्या अमानुष अत्याचार केला त्या वर्गाने, अस्पृश्याने थेट मनुवर परतुन वार केला होता. मनुवाद्यांसाठी हि घटना फार मोठी होती. हा प्रतिकार आकाशाला भोक पाडण्याच्या मनोबलाने फेकलेल्या दगडागत होता. अस्पृश्यांचा निश्चय, निर्धार व आत्मबलाचा जाहिर शक्तिप्रदर्शन करणारा व लढ्यास सज्ज असल्याची हि घोषणा होती. या घोषणेनी देशातिल सनातनी पेटुन उठले. दिसेल त्या अस्पृशाला जमेल तशा पद्धतिने ठेचण्याचे काम चालु होणार होते. पण आता मात्र अस्पृश्य नुसता प्रतिकार करणार नव्हता तर प्रतिहल्ला चढविण्याच्या वळणावर येऊन ठेपला होता. गुलामीची जाणीव झाली होती, ती झिटकारण्याची व त्या साठी दोन हात करण्याची सगळी पुर्व तयारी झाली होती. महाडची परिषद म्हणजे स्वातंत्र्याच्या पुर्वसंधेची घोषणा होती. आता गुलामगिरी एकदाची घालवुनच दम घेण्याचा निर्धार पक्का झाला होता. अशा प्रकारे मनुस्मृतीच्या दहन कार्यक्रम संपन्न झाला..!

— ✍️ प्रा. सुखसागर मोरेश्वर झाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here