लेखनी बहु महिला मंडळ बल्लारपूर चा जाहीर सत्कार

0
428

लेखनी बहु महिला मंडळ बल्लारपूर चा जाहीर सत्कार

बल्लारपूर/प्रतिनिधी : लेखनी बहु महिला मंडळ, बल्लारपूर तर्फे कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत शहरातील नागरिकांना प्रेरित करून रुग्णांना रक्ताची कमी पडु नये याकरीता राज्य रक्त संक्रमण आरोग्य विभाग मुंबई मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करवून जिल्हा रक्त पेढीला सहकार्य केले. याबद्दल दिनांक 18 जून जागतिक रक्तदान दिवशी लेखणी बहू महिला मंडळ चे झालेल्या सत्कारबद्दल शहारत कौतुक होत आहे.
मंडळाच्या अध्यक्षा शोभा गायकवाड व सर्व सन्मानीय सदस्यांनी शहरातील सर्व नागरिकांचे आभार मानले.
मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार व जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, डॉ. भास्कर सोनारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सूत्र संचालन अनंत हजारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here