डिगोळ परिसरात पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्धिधावस्थेत  

0
451

डिगोळ परिसरात पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्धिधावस्थेत  

 

 

प्रतिनिधी/बाबूराव बोरोळे

लातूर :- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ परिसरात मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झाला आहे. पेरण्या आटोपल्या असून, पावसाने पाठ फिरवल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटांनी ग्रामीण भागातील जनता त्रासून गेली आहे. त्यात मोठ्या कष्टाने खरीपाची तयारी करून जास्त कसे उत्पन्न घेता येईल.यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने पाण्याची काळजी मिटली या आशेवर बळीराजाने सोयाबीन, तुर  ,  मुग  ,  उडीद  ,  आदी बियाणे खरेदी करून पेरणी केली.पावसाने पाठ दाखवल्याने खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भीती बळीराजाला वाटू लागली आहे . या परिस्थितीतही उधार- उसनवारी करून बियाणे, खते खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. परिसरात खरीप हंगामातील  सोयाबीन ,  तुर  ,  आदी  पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.  मात्र, पावसाने  दडी मारल्याने  ,  वाढत्या उष्णतेने जमिनीची ओलही कमी होत चालल्याने सोयाबीन  ,  तुर आदी पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना  मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे .

 

 शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पेरणी थांबवून पावसासाठी आभाळाकडे ढगाकडे टक लावून बसला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here