केंद्र सरकारच्या खत वाढीच्या निषेधार्थ थाली बजाव आंदोलन

0
623

केंद्र सरकारच्या खत वाढीच्या निषेधार्थ थाली बजाव आंदोलन

हिंगणघाट, अनंता वायसे : तुर, मुंग,उडीद या कडधान्यांची आयात थांबवावी, रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे या मागण्यांना घेऊन गुरूवार २० मे २०२१ सायंकाळी ६ वाजता वयक्तिक पातळीवर गावातील चौकात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळुन करण्याचे आवाहन रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी केले आहे.

वाणिज्य मंत्रालयाने सन २०२१-२०२२ साठी ४ लाख टन तूर आणि १.५० लाख टन मुगाची आयात कोट्याला मंजुरात दिली. मे. रिफायनरीज ट्रेडर्स यांना मंजूर आयात कोट्याचे वाटप केले जाईल. तसेच केंद्र सरकार येथे थांबले नाही तर मोझंबीक भारत सरकार करारानूसार २ लाख टन तूर आयात केल्या जाईल. एकूण ६ लाख टन तूर आयात होईल. यंदाचे तुरीचे उत्पादन ३८ लाख टन जुना शिल्लक साठा ७ लाख टन २०२०-२०२१ साठी एकुन उपलब्धता ३८ अधिक ७ असे ४५ लाख टन आहे.

भारताची वार्षिक गरज ४३ लाख टन आहे. हे सर्व आकडे सरकारी विद्यापिठ प्रमाणित आहे. भारताला ४२ लाख टनाची आवश्यकता असून ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. म्हणजेच आवश्यकतेपेक्षा २ लाख टन जास्त तूर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर कशासाठी आयात केली याच उत्तर केंद्र शासनाकडे नाही. केंद्र सरकार येथेच थांबले नसून सरकारने तुर, मुग व उडीद यांची आयात आता पुर्णपणे खुली केली आहे. या संबंधीची अधिसुचना १५ मे ला काढली असून ३ वर्षापासून कडधान्य प्रतिबंधीत वर्गवारीमध्ये होते व ते आता खुल्या वर्गवारीत आणल्याने व्यापारी हे थेट आयात करणार आहे. या सर्व बार्बीचा परिणाम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबावर पडनार आहे. तुर, मुग व उडीदाचे भाव जे वाढनार होते. ते आता वाढनारच नाही तर उलट हमिभावाच्या खाली येनार आहे. शेतमालाचे भाव वाढ नियंत्रणात ठेवून सरळ शेतक-याच्या छातीवर सुरा ठेवून केंद्र सरकारचा कारभार चालू आहे.

देशामध्ये सर्वाधीक मागणी असलेल्या १०:२६:२६ खताची किंमत रु. ६०० ते रु. ७०० वरुन रू. १९७५ ते १७७५ पर्यंत गेली आहे. तर डि ए पी खताची किंमत रु. १२०० वरून रु. १९०० वर गेली आहे. व २०:२०:१३ खताची किंमत रू. ९२५ वरून रु. १३५० वर तर १२:३२:१६ खताची किंमत रु. ११४५ वरून रू. १८०० वर गेलेली असून एवढी प्रचंड भाववाढ झालेली आहे. केंद्र सरकारने कोरोनाचे संकट असताना अचानकपणे खताचे भाव वाढवून शेतक-याला हृदयविकाराचा झटका दिला आहे. ५०% नफा धरून भाव देवू अस म्हणना-या मोदी सरकारने उत्पादनावर नफा तर दुरच १०% उत्पादन खर्च वाढविला आहे. एकीकडे शेतकरी विरोधी कायदे व दुसरीकडे खताचे भाव वाढवून केंद्र सरकारने दुधारी तलवार वापरून शेतक-यांची हत्या करण्याचा विढा उचलला आहे. या सर्व विरोध म्हणून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो तसेच आम्ही खालील मागण्यांची पुर्तता न झाल्यास आम्ही तिव्र आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here