उभी असलेले ट्रॅक्टर अचानक मागे गेल्याने नऊ वर्षीय बालिकेचा दबून मृत्यू

0
701

उभी असलेले ट्रॅक्टर अचानक मागे गेल्याने नऊ वर्षीय बालिकेचा दबून मृत्यू

आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असताना झाली ही घटना

ट्रॅक्टर मालकाच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा गेला जीव

मुल तालुक्यातील पिंपरी दीक्षित येथे ट्रॅक्टर वर चार-पाच मुले मुली खेळत असताना अचानक ट्रॅक्टर मागे सरकत असल्याचे पाहून नऊ वर्षीय वैष्णवी खाली उतरण्याच्या नादात ट्रॅक्टर मध्ये दाबल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आज तीन वाजताच्या सुमारास पिंपरी दीक्षित येतील शितल खुशालराव देवतळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 बीएफ 16 14 त्यांच्या घरासमोर उभी होती, त्या ट्रॅक्टर वर चार-पाच मुले मुली खेळत असताना अचानक ट्रॅक्टर मागे जाऊ लागली, खेळणारी मुले घाबरले त्यात नऊ वर्षीय वैष्णवी मनोज ढोंगे ही ट्रॅक्टर आणि ट्राली याच्या मधोमध फसुन राहिली. मुले आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक धावून आले आणि वैष्णवीला बाहेर काढन्याचा प्रयत्न केला परंतु सर्व व्यर्थ ठरले, तिला बाहेर काढेपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती होतात मुल पोलीस घटनास्थळावरून पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाचा करिता मुल येथे पाठविण्यात आले. ट्रॅक्टर मालकाची बाजूला जागा असून सुद्धा रस्त्यावरच ट्रॅक्टर ठेवल्याने त्यामध्ये मुले खेळत असल्यामुळे हा अपघात त्याला असे गावकरी बोलत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here