कडमगाव येथे पीक पाहणी व शेतकरी सत्कार समारंभ

0
276

कडमगाव येथे पीक पाहणी व शेतकरी सत्कार समारंभ


चिमुर (ता. प्र.) :- चिमुर तालुक्यातील कडमगाव (नेरी) येथे अंकुर सिड्स कंपनी च्या वतीने कापुस कीर्ती BG 2 या वाणा वर पिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अंकुर कंपनीचे चिमूर तालुका प्रतनिधी श्री. चंद्रकांत गेडाम हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना अंकुर च्या वाणा विषय ची माहिती देण्यात आली.
तसेच सत्कार मुर्ती संजय कुबडे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रफुल संजय कुबडे, राजेंद्र जिवतोडे (नेरी), अरविंद चौधरी, अमोल भुसारी तसेच कडमगाव, रामपूर, मालेवाडा, खरकाडा, चिखलापार, कारघाटा, नेरी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here