सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपुजन

0
207

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपुजन

 

राजुरा (ता. प्र.) :– मौजा कळमना येथे 15 वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत सी सी रस्ता, नाली बंदिस्त करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे इत्यादी विकासकामांचे भुमिपुजन कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की कळमना गावातील नागरिकांना पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, गावाला स्मार्ट ग्रामपंचायत बनविण्यासाठी मी संकल्पबद्ध आहे. आजपर्यंत अनेक विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आवश्यक विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, ग्राम पंचायत सदस्य रंजना दिवाकर पिंगे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेळे उध्दव आसवले, लटारी बल्की, देवराव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दत्ता पिंपळशेळे, मदन वाढई, विठ्ठल विददे, कवडु गौरकार, गणपती कुकडे, नवनाथ ताजणे, अरुण आस्वले, मारोती वाढई, सतीश आबिलकर, लक्ष्मण आताम, मारोती खाडे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here