शासकीय कामात अडथळा ; एका प्रहार रुग्णसेवकासह इतर दोघांवर विरुद्ध गुन्हा दाखल

0
420

शासकीय कामात अडथळा ; एका प्रहार रुग्णसेवकासह इतर दोघांवर विरुद्ध गुन्हा दाखल

जिवती पोलिसात तक्रार दाखल

 

 

जिवती : तालुक्यातील तहसिल कार्यालयातील शासकीय कामात अडथळा आणत शासकीय कर्मचाऱ्यांस शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तालुक्यातील पाटागुडा येथील प्रहार रुघनसेवकासह इतर दोघां विरुद्ध जिवती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ०५/०६/२२ ला दुपारी २.४० वाजेच्या सुमारास जिवती तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात घडली.

 

याबाबत जिवती तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कक्षात अवल कारकून म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग नंदुरकर ५२ वर्षे राहणार तहसिल कार्यालय जिवती यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की घटनेच्या दिवशी मी माझ्या कक्षात शासकीय कामकाज करीत असताना आरोपी प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे व त्याच्यासह सिंधू जाधव व अरविंद चव्हाण माझ्या कक्षात आले व मला म्हणाले की तुमचा ऑपरेटर हा संजय गांधी निराधार योजनेचे काम करीत असताना अर्जदारकडून पैश्याची मागणी करतो व त्यातील ते पैसे तुम्हाला देतो, त्यावेळी तक्रारकर्ते म्हणाले की मी पैसे घेत नाही. यावेळी आरोपी जिवन तोगरे रागात येऊन माझ्या टेबलावरील प्रिंटर उचलून माझ्याकडे फेकण्याचा आव करून जाग्यावर ठेवले. व मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली, त्याच्या सोबत आलेले सिंधू जाधव व अरविंद चव्हाण यांनी पण तुम्ही लोकांकडून पैसे मागता त्या शिवाय तुम्ही लोकांचे काम करीत नाही आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देत बाहेर निघून गेले. आरोपी जिवन तोगरे, सिंधू जाधव व अरविंद चव्हाण यांना मी कोणाकडून ही
पैसे घेत नाही असे समजून सांगत असतानाच आरोपीला राग आला व त्या कारणावरून त्याने फिर्यादीला त्यांच्या करीत असलेल्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर घटना दि.०५/०६/२२ ला दुपारी २.४० वाजता तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षा मध्ये घडली आहे.

 

यावरून फिर्यादी विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील व अधिक तपास जिवती ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here