इन्फंट काॅन्व्हेंट येथे स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन

0
238

इन्फंट काॅन्व्हेंट येथे स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन

राजुरा (ता. प्र.) :– सेवा कलश फाउंडेशन राजुराच्या वतीने इन्फंट काॅन्व्हेंट येथे शाळा, महाविद्यालय तथा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एक्सलेंस आयएएस अकॅडमी पुणे येथील संस्थापक कुलदीप कोटंबे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून संस्थेचे संचालक सेवा कलश फाउंडेशन, राजुराचे अध्यक्ष अभिजीत धोटे, राहुल बजाईत, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू मंचावर उपस्थित होते.
सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि स्पर्धा परीक्षेचे युग आहे. यासाठी शालेय स्तरावरुनच विद्यार्थ्यांनी भारताचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणक व सामान्य ज्ञान यावर विशेष भर देत सातत्यपूर्ण तयारी करण्याची गरज आहे. जिवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा एक उत्तम पर्याय आहे असे प्रतिपादन कुलदीप कोटंबे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शनातून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांमध्ये अभिरुची घेऊन तयारी केल्यास निश्चितपणे यश मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी विद्यार्थीनी स्पर्धेत टिकायला हवे, आपल्या परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन आहे. अशा मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांना तांत्रिक माहिती मिळते तसेच मनातील शंकांचे निराकरण होऊन आत्मविश्वास निर्माण होतो असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उमेश लढी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here