खर्चाचा हिशोबाचे बील न दाखविता बळजबरीने सभा गुंडाळली

0
226

खर्चाचा हिशोबाचे बील न दाखविता बळजबरीने सभा गुंडाळली

संचालक दिलीप देठे यांचा आरोप ; राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील प्रकार

राजुरा : कृषि उत्पन्न बाजार समिती राजुरा येथिल दर महिन्याच्या मासिक जमा खर्चाचा हिशोब सभेत ठेवून मंजुरी घेत असतात. असाच माहे ऑक्टोंबर २०२३ या मासिक जमा खर्चाचे हिशोब सभेत उपस्थित संचालकांसमोर वाचन करून दाखविले मात्र वाचन करून दाखविताना झालेल्या खर्चाचे बील, जिएसटी बिल न दाखविता व विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न देता सभापती विकास देवाळकर व सचिव मंगला मेश्राम यांनी बळजबरीने सभा संपविल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक दिलीप देठेसह चार संचालकांनी केला आहे.

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांची मासिक सभा (दि. ०२) पार पडली या सभेत बाजार समितीच्या महे ऑक्टोंबर महिन्याभराच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवण्यात आला. सभेमध्ये उपस्थित संचालकांना सभापती अग्रीम पन्नास हजार रुपये, वाहन व इंधन खर्च चोवीस हजार नऊशे ८६ रुपये, मुख्य बाजार आवार देखभाल अठ्ठेचाळीस तीनशे ५० रुपये, मुख्य बाजार आवार दुरूस्ती चौदा हजार चारशे, अविक्री माल दुरुस्ती सोळा हजार एकशे पंच्याहत्तर, मुख्य बाजार आवार सफाई चार हजार सातशे, जाहीरात खर्च पंधरा हजार तीनशे, सफाई खर्च पाच हजार दोनशे पन्नास रुपये असा एकुण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे एकसष्ठ रुपये झाला असल्याचे वाचून दाखविण्यात आले. परंतु या झालेल्या खर्चाचा बिल किंवा जीएसटी बिल सभेत दाखविण्याची मागणी संचालकांनी केली असता आम्ही तुम्हाला बिल किंवा जीएसटी बिल विवरण दाखविण्यास बांधील नाही असे वादग्रस्त वक्तव्य करून मनमानी कारभार असल्याचे दाखवून दिले.

झालेल्या खर्चाला संचालकांनी विरोध दर्शविला असता सभापती विकास देवाळकर व सचिव मंगला मेश्राम यांनी तुम्हाला तुमने मत नोंदविण्याना अधिकार नाही असे गैरजिम्मेदारपने उत्तर दिले. यासोबतच कृषि उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक अहवाल हा तोट्यात असल्यामुळे संस्थेवर कोणताही आर्थीक नविन भुर्दड बसणार नाही याचा विचार बाजार समितीने केला पाहिजे. याकरीता नविन सेवक भरती न घेता संस्थेवरील खर्चाचा भुर्दड वाढणार नाही यासंबंधी चर्चा न करता नविन सेवकानी भरती करून संस्थेवर आर्थीक भुर्दड लादला आहे. त्यामुळे संचालक दिलीप नारायण देठे, सतिश कोमरवेल्ल्लीवार, प्रभाकर ढवस, प्रफुल कावळे यांनी सभापती विकास देवाळकर व सचिव मंगला मेश्राम यांचे विरोधात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here