यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोफत श्रमिक कार्ड अभियानाची सुरुवात

0
394

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोफत श्रमिक कार्ड अभियानाची सुरुवात

 

चंद्रपूरातील नागरिकांना मोफत श्रमिक कार्ड बनवून देण्याचा उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने हाती घेण्यात आला असून या अभियानाची काल रविवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी सदर कार्ड बनवून घेण्याकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात येऊन सदर कार्ड बनवून घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
कामगार वर्गासाठी केंद्र सरकारच्या वतीने श्रमिक कार्ड ही योजना सुरु केली आहे. मात्र सदर योजनेबाबत नागरिकांना पूरेपूर माहिती नसल्याने पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहे. तसेच काही एजंट कडून सदर कार्ड बनविण्यासाठी नागरिकांकडून अवाढव्य रक्कमही वसूलल्या जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्रमिक कार्ड मोफत बनवून देण्याची मोहिम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आली असून काल यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात या मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे. यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
नोंदणीकृत ईमारत बांधकाम कामगार, घरकाम करणा-या महिला, फुटपाथ वरील विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, वृत्तपत्रे विक्रेते, पशूपालन कामगार, शिलाई मशिन कामगार, सुतार काम करणारी व्यक्ती, शेत काम करणारी व्यक्ती, आशा सेविका व अंगणवाडी सेविका, मिठ कामगार, न्हावी कामगार, ब्युटी पार्लर कामगार महिला, पेंटर इलेक्ट्रीशियन व प्लंबर कामगार तसेच इतर कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकणार असून सदर कार्ड धारकांना स्वयं रोजगारात वित्तीय सहाय्यता, लाभार्थ्यांना मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ यासह अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहे. त्यामूळे पात्र लाभार्थ्यांना श्रमिक कार्ड बनविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here