अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

0
293

अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाद्वारे नुकतेच उन्हाळी 2020 परिक्षेच्या अनुषंगाने विद्यापिठस्तरीय गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली त्यामधे अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ चे तिन विद्यार्थी गुणवत्ता यादीमधे झळकले. एलएल.बी. पाच वर्षीय अभ्यासक्रमामधे कु.अक्षता संदीप मुके दुसरी तर कु. नेहा दिलीपकुमार बचवानी गुणवत्ता यादीत पाचवी आली. तसेच एलएल. बी. 3 वर्षीय अभ्यासक्रमात कपील गोविंदराव बंन्सोड गुणवत्ता यादीत आठवा आला आहे. सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विजय दर्डा, सचिव सी. ए. प्रकाश चोपडा, महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॕ. सुप्रभा यादगिरवार यांनी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता यादीमधे येतात याबद्दल सी. ए. प्रकाश चोपडा यांनी समाधान व्यक्त केले. व ही परंपरा यापुढेही सूरू राहावी असा आशावाद व्यक्त केला. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे यथावकाश सन्मानित करण्यात येणार आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here