पिपर्डा येथे कोरोना अँटिजेन तपासणी शिबिर

0
410

पिपर्डा येथे कोरोना अँटिजेन तपासणी शिबिर

चंद्रपुर/महाराष्ट्रात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एप्रिल महिन्यापासून कोरोनाची साखळी तोडण्याकरिता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोविड चाचणी व लसीकरण करण्याकरिता आव्हान केले असून गावागावात जाऊन आरोग्य टीम तपासणी करीत आहे.आज बुधवारला ग्राम पंचायत पिपर्डा येथे आरोग्यपथका द्वारे पिपर्डा येथील नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. गेल्या काही दिवसांत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी गावाची खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने १६ जून रोजी ग्राम पंचायत कार्यालय पिपर्डा येथे कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करन्यात येऊन भगवान कावळे सदस्य यांच्या अथक प्रयत्नतून नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली.त्यामध्ये ७१ नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात आली.शिबिरप्रसंगी माणिक भोंडे,आरोग्य सेवक,किशोर नवघडे आरोग्य सेवक,सोमेश्वर निखाडे, प्रणिता पिसे प्रयोगशाळा तंत्रज्ञान,चेतन सोरदे,अटेंडन,हजारे,आरोग्य सेवक,जी एस मानकर सचिव,प्रमोद बोरकर,प्रमोद मेश्राम ऑपरेटर,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here