लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षेत चंद्रपूरच्या श्वेता चे घवघवित यश

0
528

लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षेत चंद्रपूरच्या श्वेता चे घवघवित यश

 

चंद्रपूर : येथील कु. श्वेता दशरथ कौरसे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी 2019 च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले.

श्वेता ने रामटेक येथे 2018 मध्ये सिव्हिल पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करून नोव्हेंबर 2019 ला परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेची मुलाखत जानेवारी 2022 ला झाली. स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल 13 एप्रिल 2022 ला घोषित झाला. त्यामधे तिने घवघवीत यश संपादन करून संपूर्ण चंद्रपूर आणि परिवाराचे नाव उज्वल केलं. त्यात श्वेता दशरथ कौरासे हिने यश संपादन करत जलसंपदा विभागातील श्रेणी 2 या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली.

तिचे वडील वेकोली चंद्रपूर विभागात कार्यरत आहे. आई गृहिणी आहे. मोठी बहीण जिल्हा परिषद शिक्षिका आहे. लहान भाऊ अभियंता आहे. या यशाचे श्रेय तिने आई, वडील, मोठी बहीण व गुरुवर्य यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here