आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन

0
475

आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन

 

 

चार राज्याच्या निवडणुका होताच देशात पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किमतीत प्रचंड वाढ झाली. यामुळे सर्व वस्तुचे भाव वाढले. सध्या दररोज पेट्रोल डिझेल दरवाढ होत आहे. याचा विरोध करण्याकरिता आम् आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांचे मार्गदर्शनात व
जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांचे नेतृत्वात गुरुवार दि. २१/०४/२०२२ ला दुपारी 4.3० वाजता गांधी चौक महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन करण्यात आले.

 

यावेळी आम् आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे म्हणाले, जेव्हा इंधन दर वाढ होते तेव्हां दळणवळण महागते आणि त्यामुळे बाजारातील सर्वच वस्तुचे भाव वाढ म्हणजे महागाई वाढते, ज्याचे चटके केवळ गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना सहन करावे लागतात.

 

सन २०१४ पूर्वी पेट्रोल-डीझेल किंवा lpg च्या भावात २०-२५ पैसे वाढले तरी बीजेपी रस्त्यावर आन्दोलण करायची, परंतु आता ते सत्तेवर आल्यापासून दररोज भाव वाढ होते, जेंव्हा की १० वर्षांपूर्वी पेक्षा आता क्रूड ओईल चे भाव कमी झाले आहेत. मधल्या काळात तर अगदी खालच्या स्तरावर म्हणजे ३०-३५ डॉलर @ बॅरल पर्यंत क्रुडऑइलचे दर घसरले होते, तरीही भारतात पेट्रोल-डीझेल- गैस सिलेंडर चे भाव त्याप्रमाणात कमी करण्यात आले नाहीत. उलट मोठ्याप्रमाणात भाव वाढ करण्यात आली.
आज पेट्रोल 121, डिझेल 105 तर गॅस सिलेंडर 1001 च्या वर पोहचले आहे.

 

गोरगरीब जनता तर गॅस बंद करुण चुलीवर स्वयंपाक करायला भाग पाडाले आहे. याचा कुठेतरी विरोध व्हायला पहिजे म्हणून आज आम आदमी पार्टी कडून चंद्रपूर येथील गांधी चौकात महागाई विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले. यावेळी ऍड सुनिता पाटील महिला अध्यक्ष, विजय सिद्धावार जिल्हा उपाध्यक्ष, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, राजेश चेडगुलवार जिल्हा मीडिया हेड, शंकर धुमाळे ऑटो संघटन जिल्हाध्यक्ष , सुनील भोयर महानगर संघटन मंत्री, योगेश आपटे उपाध्यक्ष, राजकुमार कांबळे, संजय ब्राह्मणे, निलेश रामटेके, परमजीत सिंग झगडे, लक्ष्मण पाटील, गोपाल भूतडा, शबनम शेख, दिलेश पाटील, सुजाता बोडेले, आरती आगलावे, जास्मिन शेख, पवन वाघमारे, अनुप तेलतुंबडे, जय देवगडे, चंदू माडुरवार, आश्रफ सय्यद, ॲड प्रतिक विराणी, राजू चोरिया, बेबी बाई मुंगळे, दुर्गे डोंगरे, रूपा काटकर, मीना पोटफोडे, वदंना कुंदनवार, शुभद्रा मून, पूजा खोबरे, सपना वाघमारे, शर्मिना विश्वास, मधुकर साखरकर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here