मिरची तोड मजुरांवर चक्क होळीच्या दिवशी काळाचा घाला

0
633

मिरची तोड मजुरांवर चक्क होळीच्या दिवशी काळाचा घाला

बसची समोरासमोर पिकअपला जोरदार धडक

प्रतिनिधी । आलापल्ली वरुन आष्टी मार्गाने येणाऱ्या क्र. टीएस ०४ युडी ५८४० पिकअपला विरुद्ध दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एस. टी. बस क्रमांक एमएच ४० वाय ५६०१ बसने समोरासमोर धडक मारल्याने या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला तर १० जन गंभीर जखमी झाले आहेत.
सदर घटना चंदनखेडी गावाजवळ घडली असून पिकअपने प्रवास करणारे व्यक्ती आवळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणा राज्यामध्ये मिरची तोडणी कामाकरीता मागील काही दिवसांपूर्वी गेले होते. मिरची तोडणीची कामे आटोपल्यानंतर स्व:गावी परत येताना त्यांच्या वर झालेल्या भिषण अपघातामुळे त्यांच्या आप्त परिवारावर मोठा आघात झाला आहे. सदर घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here