दुसऱ्या बाजूचा रस्ता न झाल्यास प्रहार चा आंदोलनाचा इशारा

0
513

दुसऱ्या बाजूचा रस्ता न झाल्यास प्रहार चा आंदोलनाचा इशारा

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
गडचांदूर येथील पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतचा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मागील 1 वर्षापासून खोदून ठेवला आणि हे काम अचानकपणे बंद पडले.दररोज याठिकाणी लहानमोठ्या अपघातांची मालिका सुरू होती.हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे 24 तास याठिकाणी वाहतूक सुरू असते.गडचांदूर शहरात व जिवती तालुक्याकडे जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. धुळ व खड्डेयुक्त या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्याची मालिका सुरू होती. शेवटी तडकाफडकी याठिकाणी एका बाजूचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मात्र रस्त्याच्या दुसर्‍या बाजूची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच असल्यामुळे सूरू असलेल्या एकेरी रस्त्यावरून मोठमोठे वाहने ये-जा करीत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना पुन्हा जुनाच त्रास सहन करावा लागत आहे.जनतेला होणारा मनस्ताप व जीवघेणी समस्या लक्षात घेऊन पुर्वी प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांनी संबंधित विभागाकडे सतत पत्रव्यवहार केला, आंदोलन सुद्धा केले,यानंतर एकतर्फी रस्ता तयार करण्यात आला.मात्र आता येत्या 8,10 दिवसात या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू करून पुर्ण न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा बिडकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here