पोलीस नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांना कंठस्नान तर तिन जवान जखमी ; गडचिरोली पोलिसांना मोठं यश

0
697

पोलीस नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांना कंठस्नान तर तिन जवान जखमी ; गडचिरोली पोलिसांना मोठं यश

गडचिरोली, सुखसागर झाडे

गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगढ सिमेलगत असलेल्या ग्यारापती कोटगुल जंगल परिसरात उडालेल्या पोलीस नक्षल चकमकीत 26 नक्षलींचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठं यश आले आहे. तर या चकमकीत तिन जवान जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी इम्पॅक्ट 24 न्युज शी बोलतांना दिली.

प्राप्त माहिती नुसार १३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास गडचिरोली पोलीस दलाचे सि-६० जवान ग्यारापती कोटगुल जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोलीस व नक्षल यांच्यात चकमक उडाली यात २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश आले आहे.

सदर घटनेमुळे नक्षली संघटनेला मोठा हादरा बसलेला आहे तर घटनास्थळ परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here