भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

0
427

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

भाजपाचे तीन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे गोंडवाना सैनिकी विद्यालय चामोर्शी रोड (वाकडी ) गडचिरोली येथे दिनांक १२,१३ व १४ नोव्हेंबर असे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर रामदास आंबटकर, माजी आमदार अनिल सोले , आमदार डॉ देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लारवार, गोविंद सारडा, प्रमोदजी पिपरे, नगराध्यक्षा सौ.योगिताताई पिपरे , प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशिक्षण वर्ग जिल्हा संयोजक अनिल पोहनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

या प्रशिक्षण वर्गाला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून त्याचा लाभ कार्यकर्त्यांना मिळणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील विविध भागातून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती सहभाग दर्शविला आहे.
दि. १४ ला दु ३ वा. विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या उदबोधनानंतर या प्रशिक्षण वर्गाचा समारोप होणार आहे.

प्रशिक्षण वर्गात अपेक्षित असणारे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले असुन कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here