घुग्घुस ऑल इंडिया समता सैनिक दल तर्फे स्मृतीशेष एल आर बाली यांना आदरांजली

0
406

घुग्घुस ऑल इंडिया समता सैनिक दल तर्फे स्मृतीशेष एल आर बाली यांना आदरांजली

घुग्घुस/पंकज रामटेके
घुग्घुस येथील ऑल इंडिया समता सैनिक दल येथे स्मृतीशेष एल.आर. बालि यांचा आदरंजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा येथे पुष्पगुच्छ मेणबत्ती, अगरबत्ती, दीप प्रज्वलन करून सामुहिक बुद्ध वंदना करून अभिवादन करण्यात आले. तसेच पुतळा परिसर हॉल मध्ये आदरांजली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
ऑल इंडिया समता सैनिक दल घुग्घुसच्या मध्यामतून कार्यक्रम घेण्यात आले. आंबेडकरी चवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता लेखक, भीम पत्रिकाचे संपादक समता सैनिक दल चे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष स्मृतीषेश एल. आर. बाली यांचे 6 जुलै 2023 कालवश झाले होते. या अनुसंगाने 12 जुलै 2023 बुधवारला एल.आर.बाली याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली, अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत मा.बी.टी.शेंडे, आयु. ध्यानानंद शिंदे, मनोहर कवाडे, संभाजी पाटील, भिमेंद्र कांबळे, तारकाबाई बनसोड, सरस्वताबाई पाटील यांनी आपले मनोगत व आदरांजलीअर्पण केली. तसेच उपस्थित सर्व धम्म उपासक व उपासीका यांनी सुद्धा पुष्पानी आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमात विशेष उपस्थिती समता सैनिक दल चंद्रपूरचे आयु. अनंत बाबरे (जिल्हा प्रमुख), डॉ. घडसे (बौद्धिक प्रमुख) सचिन सातपुते, रुपेश वालकोंडे, संगीता तावाडे (महिला प्रमुख) हजर होते.
या प्रसंगी अशोक (बंडू) रामटेके, गंगाधर गायकवाड, श्याम कुमरवार, संतोष कांबळे, दिनेश घागरगुंडे, चंद्रगुप्त घागरगुंडे, देवानंद सुटे, विजय रामटेके,जगन्नाथ परागे, जगन जवादे, बापूराव कांबळे, बाबा आमटे, शरद पाईकराव, अनिल कांबळे, सुषमा चांदेकर, कविता परागे, रीता कोवले, उषाताई आगदारी, भारती सोदारी, सुनंदा सोदारी, शलक्ष्मीबाई चांदेकर, रीता देशकर, माया धोटे, कामिनाबाई देशकर, अनुसयाबई वानखेडे, मंदाताई धोपटे, सुनंदा माहुलकर व घुग्घुस परिसरातील इतर धम्म उपसिक व उपसिका उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार सोहन पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here