‘धनी धुर्यावर चोर मुळावर’

0
426

‘धनी धुर्यावर चोर मुळावर’

जिवती तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची गत

 

जिवती : जिवती तालुक्यातील प्रधानमंत्री लाभार्थी शासनाने ठरविलेल्या वयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे काही संधीसाधू राजकीय कार्यकर्ते व बांधकाम ठेकेदारांसाठी जनू काय कुरनच ठेरले आहे. मात्र जिवती तालुक्यातील खडकी रायपूर ग्राम पंचायत मधील लेडीगुडा येथील अशा ठेकेदारांची तक्रार पोलिसात दाखल करून या शोषण व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटले आहे. सामान्य माणसामधील हा बद्दल पाहून अनेकांना घाम फुटू लागल्याचे चित्र आहे.

 

प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे व सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई राठोड यांनी जिवती तालुक्यातील लेडीगुडा गावात भेट देऊन गावातील लोकांचे घरकुल बांधकामची पाहणी केल्यानंतर त्यांचेही मन हेलावून गेले. महाराष्ट्रात कुठेही ठेकेदारी पद्धतीने घरकुल बांधले जात नसताना केवळ जिवती तालुक्यातच घरकुल ठेकेदारी पद्धतीने का बांधले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून रूग्णसेवक जिवन तोगरे व सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई राठोड यांनी सामान्य माणसाला लुबाडणाऱ्या ठेकेदारविरुद्ध फौजदारी कार्यवाही झाली पाहिजे असा इशारा दिला.

 

ठेकेदारांकडून शासन निधीचा व्यक्तिक लाभासाठी अपव्यव व सामान्य माणसाची फसवणूक हे दखलपत्र गुन्हे करणाऱ्या विरुद्धत तातडीने कारवाही करावी.पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात देखील शासन स्तरावरून कारवाई केली जाईल, असा इशारा यामुळे प्रभावित होऊन खडकी – रायपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील आत्तम धनू चव्हाण, गणेश रुपला राठोड, रुस्तम लक्ष्मण पोले, बालाजी गंगाराम वाघमपल्ले, कमलबाई दिगांबर जिवनपल्ले,आदी प्रथमच अन्याया विरुद्ध बंड पुकारत संबंधीत ठेकेदारांची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. यामुळे आतापर्यंत सामान्य माणसाच्या योजना लाटनाऱ्या अनेकांचे कारवाईहीच्या भीतीने धाबे दणानले आहे.

 

सामान्य माणसाच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा गैरफायदा घेऊन येथील काही राजकीय संधीसाधू कार्यकर्ते व त्यांच्या संपर्कातील बांधकाम ठेकेदारांनी सामान्य माणसाच्या योजना लुटण्याचा सपाटा लावला सामान्य माणसाला घरकुल मंजूर होताच पंचायत समितीमधील यंत्रणा अशा लोकांच्या हाती सबंधित सामान्य माणसाची यादी सोपवून सामान्य माणसाची शोषणाची पार्श्वभूमी तयार करते. सदर ठेकेदार लोकांना गाढून ह्यतूझ्या घरकुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, मला तूझ्या घरकुलाचे बांधकामं करायचे आदेश झाले आहेत असे बनाव रचतात व लोकांच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा गैरवापर घेऊन त्याला बँक खात्यातील पैसे काढण्यास बाध्य करतात. थातूर मातुर व अर्धवट बांधकाम करून सामान्य माणसाच्या घरकुल योजनेचा पैसा लाटनाऱ्यांच्या मोठी फौज मनिकगड पहाडावर कार्यरत आहे. सबंधित विभागातील शासकीय कर्मचारी व राजकीय कार्यकर्ते सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात असून, सामान्य माणसाच्या विकासाठी असलेल्या योजनांवर डल्ला मारणारे रॉकेटच येथे सक्रिय असल्याने दबक्या आवाजात बोलले जात आहे. लोकांना मंजूर घरकुलांची माहिती संबंधीत विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष त्या लाभार्थ्याला सांगण्याऐवजी अशा लुटारु ठेकेदारांना का सांगतात.?
घरकुलाच्या बांधकामातील प्रत्येक टप्यावर प्रगती पाहूनच लेखा विभागातून पुढील बिले काढण्यासंबंधीचे नियम असतांना बांधकाम झालेले नसतांनाही लाभार्थ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे कसे जमा केले जातात? आजपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती या विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मच्याऱ्यांनी लाभार्थ्यांचे घरकुल योजनेचा प्रत्यक्ष गावावर जाऊन आढावा का घेतला नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले असून, पोलिसांच्या तपासात या प्रश्नांची उकल होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here