आमदार कैलास दादा पाटील यांनी दिला धम्मोदय जेतवन महाबुध्द विहारासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी 

0
816

आमदार कैलास दादा पाटील यांनी दिला धम्मोदय जेतवन महाबुध्द विहारासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी 
उस्मानाबाद🟥🔲किरण घाटे🔲🟥घाटग्री परिसरात बौध्द भिख्खु सुमेधजी नागसेन यांनी धम्मोदय जेतवन महाबुध्द विहाराचे नियोजन केले असुन या महाबुध्द विहारासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास दादा पाटील यांनी आमदार निधीतून सभागृह बांधकामासाठी रुपये पंचवीस लाख रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करून दिला आहे .सदरहु निधी उपलब्ध करून दिल्या बाबत समाज बांधवांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उस्मानाबादच्या आजपर्यंतच्या आमदारकीच्या कार्यकाळातील आमदार कैलास दादा पाटील यांनी हा निधी बौध्द धम्माच्या कार्यासाठी दिला ही गौरवाची बाब आहे. सत्कार कार्यक्रमाला प्रामुख्याने भदंन्ते सुमेधजी नागसेन,धनंजय वाघमारे,अंकुश उबाळे, पृथ्वीराज चिलवंत, गणेश रानबा वाघमारे,संग्राम बनसोडे, पुष्पकांत माळाळे, अमोल वाघमारे, सोमनाथ गायकवाड, स्वराज जानराव, उदयराज बनसोडे,मेसा जानराव, महादेव वाघमारे, रमेश कांबळे,विजय गायकवाड, संजय गजधने, संपत शिंदे, गायकवाड, शामराव बनसोडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here