नव्याने येणार दीपारंभ दिवाळी अंक २०२०, वाचकांसाठी वाचनीय साहित्य

0
387

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

नव्याने येणार दीपारंभ दिवाळी अंक २०२०, वाचकांसाठी वाचनीय साहित्य

प्रत्येक वर्षी फटाके, दारी आकाश कंदील व रांगोळी यासोबतच विशेष आकर्षण ठरतो तो दिवाळी अंक. दिवाळी अंक हा  दिवाळी अंकाचा चेहरा असतो त्यात विविध लेख, प्रतिक्रिया व मुलाखती आणि जाहिराती यांचा वाचनीय फराळ वाचकांसाठी उपलब्ध केला जातो.

यंदा मात्र वाचकांसाठी दिवाळी अजूनच खास असणार आहे कारण वाचक वर्गासाठी पहिल्यांदाच लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात *दीपारंभ दिवाळी अंक २०२०* हा दिवाळी अंक येणार आहे.

या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे युवा संपादक असून त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण टीम ही अत्यंत हुशार व माध्यम क्षेत्रात काम करणारी आहे या दोन वैशिष्ट्यांमधून एकंदरीत हा दिवाळी अंक किती सुदंर असणार आहे याची बऱ्यापैकी कल्पना आली असेलच. त्याचबरोबर दीपारंभ दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर अभिनेता सयाजी शिंदे सर व अभिनेत्री धनश्री काडगावकर बघायला मिळणार आहे.

कोरोनाचे सावट जरी आपल्यावर असले तरी विचारांचे आदान प्रदान कधीच बंद करता येऊ शकत नाही त्यामुळे मोठं-मोठ्या लेखकांनी त्यांचे विचार मांडले आहेत मग ते हेमंत देसाई, रश्मी करंदीकर, रोहित पवार, संदीप देशपांडे असो व प्रज्ञा शिदोरे, सहदेव घोलप, धनराज वंजारी, सोनाली लोहार, अनिल गलगली इ. मान्यवर मंडळींनी त्याचे विचार अगदी सूक्ष्मलक्षी अभ्यास करून मांडले आहेत.

त्यामुळे यंदाची दिवाळी नवे विचार आत्मसात करून साजरी करूया. दीपारंभ दिवाळी अंकाचे अनावर सतत मराठी अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि मराठी सणांचे महत्त्व नेमकं काय आहे हे त्यांच्या कामातून वेळोवेळी दाखवून देणाऱ्या मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते दिनांक १४/११/२०२० रोजी त्यांच्या कृष्णकुंज निवास स्थानी झाले.

दिवाळी अंकाची किंमत केवळ १२५ रु. इतकी असून दिवाळी अंक हवा असल्यास खालील दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क करा. ९८७०९९३००३, ७९७२२१३८४४, शुभम शंकर पेडामकर ह्यांच्या कडून ऊपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here