संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0
370

संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले

झरी(जामणी)तालुक्यात संभाजी ब्रिगेड झरी तालुका वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,झरी तालुका हा मागास तालुका असुन पाहिजे तेवढ्या प्रमाणात रक्तदानांची जागृती तालुक्यात झालेली नाही,व लोकांना त्याचे महत्त्व देखील कळले नाहीत.

रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी व त्याचे महत्त्व लोकांना कळावे याच हेतूने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ धोबे प्रमुख उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी मा.गेडाम साहेब ठाणेदार,पाटण पोलीस स्टेशन संगिता हेलोंडे मॅडम,डाॅ विरखडे साहेब ग्रामीण रुग्णालय झरी सं.ब्रि. जिल्हाकार्याध्य समिर लेनगुळे म.से.सं तालुकाध्यक्ष केतन ठाकरे,निलेश येल्लटीवार,दत्ता डोहे,नितेश ठाकरे, संदिपभाऊ आसुटकर, वैभव मोहितकार,कुणाल पानेरी आदी उपस्थित होते,या रक्तदान शिबिरामध्ये ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here