आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा समिती तर्फे ग्राम विस्तार मेळावा

0
163

आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा समिती तर्फे ग्राम विस्तार मेळावा

 

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. नागेश्वर गंडलेवार जिल्हा संघटन मंत्री यांच्या नेतृत्वात दिनांक 13/1/2024 ला कोठारी येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि भगतसिंग यांच्या प्रतिमे समोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.

आम आदमी पार्टी च्या विचारधारेला आणि दिल्ली, पंजाब येथील कामाला प्रेरित होऊन आप मध्ये असंख्य कोठारी ग्राम मधील जनतेनी पक्ष प्रवेश करीत आम आदमी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. ग्राम विस्तार मेळावा या मंचावर उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष श्री. सूरज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भारतीय घडामोडी वर विशेष भर दिला. तर जिल्हा अध्यक्ष महिला ज्योती बाबरे यांनी महिला सक्षमीकरण बद्दल महिलांमध्ये जनजागृती संदर्भात आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाची उत्कृष्ट अशी जवाबदारी रवी पुप्पलवार अध्यक्ष बल्लारपूर शहर यांनी पार पाडली.

जनतेमध्ये आप बद्दल असलेले छुपे प्रेम हे हळू हळू का होईना दिसून येतंय, जनता बीजेपी सारख्या आणि इतर मित्रपक्षांना कंटाळली असून आप ला मौका देण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे असे मत प्रा. गंडलेवार यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण श्री. राईकवार यांनी जनतेला सुविधा शेतकरी बांधवाना कर्जमाफी आदी बाबत जनतेला जनजागृती अवगत करून दिले व भविष्यात आप तर्फे दिल्ली पंजाब सारखे काम आपल्या क्षेत्रात घडवून आणू असे सांगितले.

कार्यक्रम स्थळी जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी यांनी आभार प्रदर्शन केले व जनतेला आप सोबत जुडण्यास सांगितले. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असून अनेकांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here