घरी विलिनीकरण असलेले रूग्ण शहरात फिरतात!

0
502

घरी विलिनीकरण असलेले रूग्ण शहरात फिरतात!

न.प. च्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष?

संशयित रुग्णाचा घरावर कोविड फलक लावले नाही

गडचांदूर/प्रवीण मेश्राम : गडचांदूर शहरात सध्या जिकडे-तिकडे कोरोना संसर्गजन्य बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी कोरोना बाधितांवर लक्ष ठेवणे, त्यांचे विलिनीकरण, औषधी, बाधित झालेल्या व्यक्तीचे घरावर कोविड प्रतिबंध क्षेत्र असा फलक लावण्यात येणे हे सर्व कामे हे नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या देखरेखीखाली सुरळीत सुरू होते पण काही दिवसांपासून शहरात विविध भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले असून सुद्धा त्यांना घरीच विलिनीकरण ठेवले जाते त्यामुळे नगर परिषदेने त्यांच्या घरावर किंवा मुख्य दारावर कोविड प्रतिबंध क्षेत्र असा फलक लावणे गरजेचे असून सुद्धा फलक लावले जात नाही त्यामुळे हे कोरोना संशयित रुग्ण खुलेआम शहरात फिरताना दिसतात तर नगर परिषदेचे काही नगर सेवक/सेविका आणि कर्मचारी यांना सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त असून त्यांना सुध्दा घरातच विलिनीकरण ठेवले आहे मात्र कोविड प्रतिबंध क्षेत्र असा फलक लावण्यात आला नाही त्यामुळे आता तरी नगर परिषदेने संशयित कोरोना रुग्णांच्या घरावर फलक लावण्यात येणे गरजेचे असून आजूबाजूच्या लोकांना माहिती असायला हवी नाही तर बाधितांची संख्या झपाट्याने वाढत जाईल यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here