गडचिरोली जिल्ह्यात १९१नविन कोरोणा बाधीत ५७३जणांनी केली कोरोणा वर मात तर १६ जणांचा मृत्यू

0
410

गडचिरोली जिल्ह्यात १९१नविन कोरोणा बाधीत ५७३जणांनी केली कोरोणा वर मात तर १६ जणांचा मृत्यू

सुखसागर झाडे : आज जिल्हयात 191 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 573 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 26826 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 23075 वर पोहचली. तसेच सद्या 3148 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 603 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 16 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 42 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय महिला, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 24 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 25 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 57 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.02 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 11.73 टक्के तर मृत्यू दर 2.25 टक्के झाला.

नवीन 191 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 5, आरमोरी 2, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 2, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 13, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 9, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 20 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 573 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 206, अहेरी 65, आरमोरी 31, भामरागड 6, चामोर्शी 36, धानोरा 18, एटापल्ली 44, मुलचेरा 21, सिरोंचा 32, कोरची 17, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 69 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here