नोकारी कुसुंबी रस्त्यावरील माईन्स रापट वरूण गॅस वाहन घसरले, वाहन चालक थोडक्यात बचावला

0
426

नोकारी कुसुंबी रस्त्यावरील माईन्स रापट वरूण गॅस वाहन घसरले, वाहन चालक थोडक्यात बचावला

 

कोरपना प्रतिनिधी : गडचांदूर वरून नोकरी गोवारी गुळा लिंगनडोह कुसुंबी मार्गावरील अल्ट्राटेक माणिकगड माईन्स ने बांधलेला रपटा जीवघेणा ठरला असून यापूर्वी मनुष्य वाहून गेल्याची घटना घडली. आज गडचांदूर वरून पिक अप वाहन ग्राहकांना वितरण करण्याकरिता कुसुंबी लिंगनगडोह येथे जात असताना अचानक पाण्याचा पुराचा प्रवाह आल्याने वाहन रपट्या खाली घसरले. वाहन चालक उडी मारल्याने थोडक्यात बचावला.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी म्हणून हा रस्ता तयार केला. मात्र या परिसरातील आठ ते दहा गावातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी जीव घेणा ठरला असून कंपनीने मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामात अडथळा निर्माण केल्याने या ठिकाणी पुलाचे काम झाले नाही. या वर्षातील ही दुसरी घटना असून कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केलेली नाही. लगत असलेल्या गोवारी गोळा येथील महिला मोठ्या संख्येने भांडीकुंडी व कपडे धुण्यासाठी या घाटावर येत असतात तसेच हा वरदळीचा रस्ता असल्यामुळे येथे पुलाची नितांत गरज आहे. मात्र कंपनीने हा रस्ता अतिक्रमण केल्यामुळे अनेक लोकांना अडथळ्यातून प्रवास करावा लागतो. तातडीने या ठिकाणी कंपनीने पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here