कोरोना जनजागृती काव्यधारा – ४
कवी – मिलेश साकुरकर, चंद्रपूर

कविता : आनंद नाही
कोरोना नियंत्रण अभियान
माझे कुटुंब, माझी जबाबदारी
मोहीम आरोग्य तपासणीची
चला घेऊया खबरदारी……
शासनाने केली सोय
शासन आपल्या दारी
म्हणून आरोग्य पथक
तपासणीस आपल्या दारी…
नको नकार, नको आक्रोश
गड्या घेऊ थोडे उमजून
करावी तपासणी कुटुंबाची
आपली जबाबदारी समजून…..
करून घेऊ तपासणी
शासन घेते खबरदारी तुमची
असेल सर्दी, खोकला, ताप जरी
तुमचे कुटुंब जबाबदारी तुमची……
कोरोनाचं संक्रमण
भयंकर जीव घेणा आजार
तुमची आरोग्य तपासणी
होईल तुमचाच आधार……
आंधळ्याला प्रकाश नाही
कुटुंबावीणा जग नाही
आता कोरोना नको रे बाबा
कुटुंबावीणा आनंद नाही…..
कवी – मिलेश साकुरकर, चंद्रपूर
संपर्क : ९७६३४२६५३१
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)