हायमास्ट तसेच पथदिव्यांचे लोकार्पण मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते….

0
384

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

बऱ्याच कालावधीपासून हिंगणघाट नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या कारंजा चौक ते काळी सडक व कारंजा चौक ते चौधरी चौक या दरम्यानच्या एल.ये.डी हायमास्ट दिव्यांचे त्याच प्रकारे या अंतरामध्ये असणाऱ्या पथदिव्यांचे लोकार्पण मा.कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते दिनांक १७/१०/२०२० ला करण्यात आले. मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या विशेष निधी अंतर्गत मंजूरीतील कामे असून हिंगणघाट शहराच्या लौकिकांत वाढ झाली असून अतिशय प्रकाशित शहर व्हावे या करिता बरेच दिवसापासून नागरिकांची मागणी होती. यामुळे नागरिकांची बरीच सोय झालेली आहे. हे पथदिवे सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला सदर परिसरामध्ये लाईट लावल्याने शहरातील परिसर प्रकाशमय झाला असून मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कामाविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांना अतिशय सुरक्षितपणे व सजक पणे जीवन जगण्यामध्ये या हायमास्ट लाइटचा व पथदिव्यांचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.पोफळे साहेब, विद्युत शाखेचे अभियंता श्री.वाघ साहेब, तसेच हिंगणघाट शहराचे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष मा. प्रेमबाबू बसंतानी, भाजयुमो चे प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकूर, हिंगणघाट भाजपा शहराध्यक्ष आशिषजी पर्बत, तसेच स्टार प्रचारक श्री.राकेश शर्मा, नगरसेवक राहुल सोरटे, श्री.धारकर, श्री.दिनेश वर्मा, श्री.राजू जी राठी, श्री.विपिन पटेल,श्री.देवा कुबडे, श्री.महेंद्र पचोरी, श्री.गोपाल जी पुरोहित, श्री. किरण वैद्य, श्री.प्रदिप जोशी, खैरातीलाल बत्रा, विजय मुथा (व्यापारी संघटना प्रमुख) श्री.गोविंद पुरोहित, श्री.मनोज रुपारेल इत्यादी कार्यकर्ते व गावकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here