जागतिक एड्स दिना निमित्य आदर्श शाळेतील विध्यार्थीनी साकारली AIDS 1097 हेल्पलाईन

0
241

जागतिक एड्स दिना निमित्य आदर्श शाळेतील विध्यार्थीनी साकारली AIDS 1097 हेल्पलाईन
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत एचआयव्ही एड्स विषयी माहिती व जनजागृती
राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट -गाईड्स चे आयोजन

राजुरा, 2 डिसें. : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट- गाईड च्या विद्यार्थ्यांसोबतच इतरही विद्यार्थ्यांनी मिळून विध्यार्थी साखळीच्या माध्यमातून AIDS 1097 ही हेल्पलाईन साकारून राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत एचआयव्ही एड्स विषयीची माहिती देऊन जनजागृती केली. “आता समुदायाच्या नेतृत्व व आघाडीने एड्स संपवूया अधिक गतिमानतेने” हे यावर्षीचे घोषवाक्य आहे. त्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी आणि देशाचा एक जागरूक नागरिक म्ह्णून आपल्या सर्वांचे हे कर्तव्य असून एड्स जनजागृती करीता सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट मास्तर बादल बेले यांनी केले.

यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती कल्लूरवार, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, जयश्री धोटे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते, माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here