राजूरा तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना पट्टे द्या तहसीलदारांना दिले अर्ज – वंचित चा पुढाकार

0
234

राजूरा तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना पट्टे द्या तहसीलदारांना दिले अर्ज – वंचित चा पुढाकार
वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मारोती जुलमे तथा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वात राजूरा तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पट्टे मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या अर्जाचा गठ्ठा राजुरा येथील नायबतहसीलदार साहेब यांना देण्यात आला. राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीसी बजावल्या होत्या त्यामुळे भटके, विमुक्त तसेच अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर होण्याची आणि उपासमार होण्याची भीती निर्माण झाली या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे 20 जुलैला मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गायरान जमिनीवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही असे ठोस आश्वासन दिले होते व गायरान जमिनीच्या सातबारावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारा मार्फत राबविण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे तथा तालुकाध्यक्ष मारोती जुलमे यांच्या नेतृत्वात राजूरा तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या अर्जाचा गठ्ठा राजुरा येथील नायबतहसीलदार साहेब यांना देण्यात आला. यावेळी राजुरा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बंडू वनकर, राजू जुलमे, सतीश कांबळे, मधुकरजी चुनारकर, चरणदास रत्नपारखी, शंकर रामटेके, शंकर झाडे, चंद्रशेखर मालखेडे, प्रभुदास वनकर, कमलदास नागरकर, विठ्ठल धोटे, नागोराव पडवेकर, विलास करमणकर, चरणदास नगराळे, ताई बाई थेटे, प्रमिला तावाडे, कविता सिडाम, रमेश आत्राम, लेतू मळावी, भीमराव अत्राम, मोहम्मद शफी दादामिया तथा इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here