शिवनगर शास्त्रीनगर आंबेडकर नगर मध्ये वाघाची दहशत असल्यामुळे येथील कचरा तत्काळ साफ करण्याची आम आदमी पार्टीची मागणी…….

0
579

शिवनगर शास्त्रीनगर आंबेडकर नगर मध्ये वाघाची दहशत असल्यामुळे येथील कचरा तत्काळ साफ करण्याची आम आदमी पार्टीची मागणी…….

 

घूग्घुस शहरामध्ये असलेल्या शिवनगर शास्त्रीनगर व आंबेडकर नगर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाड झुडूप व कचरा आहे याकडे नगरपरिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यातच या परिसरामध्ये वाघ आढळून आल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु याकडे नगरपरिषद घूग्घुस चे दुर्लक्ष आहे. इथे वाढत असलेल्या झाड झुडुपा मुळे इथे वन्य प्राणी येत आहे. 13 ऑक्टोबर 2022 रोजी याच परिसरामध्ये वाघ आढळून आला. ज्यामुळे इथे कोणतीही जीवितहानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद घुग्घुसची राहील.

ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर, नगरपरिषद घुग्घुस यांच्या कडे तत्काळ येथील साफ सफाई करण्याची मागणी केली.

शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here