स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या! युवक काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरपना तालुका युवक काँग्रेसचे वतीने दालमिया सिमेंट ग्रुप (पूर्वीची मुरली ऍग्रो सिमेंट) नारंडा येथील व्यवस्थापक श्री. कोल्हटकर साहेब यांना खालील मागण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, मा.विधानसभा अध्यक्ष प्रा.आशिष देरकर, न.प.गटनेता तथा बांधकाम सभापती विक्रम येरणे, गडचांदूर शहर अध्यक्ष संतोष महाडोळे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, कार्यकर्ता प्रणय टेकाम, नितेश शेडमाके उपस्थित होते.
यावेळी मुरली ऍग्रो मध्ये पूर्वी लागलेले कायम व कंत्राटी कामगारांना प्रथम प्राधान्य देणे. स्थानिक युवकांना कामावर घेणे. परिसरातील कंत्राटदारांना कंत्राट देणे. प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे. कोविड-19 बाबत सुरक्षेची उपाययोजना करणे. या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.