गळफास घेऊन एकाची आत्महत्या

0
1014

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

पोंभुर्णा तालुक्यातील घटना

पोंभुर्णा प्रतिनिधी :-जाम खुर्द येथील शेतातील जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील जाम येथे आज सकाळी उघडकीस आली. मुर्लिधर शिंदे वय ६० वर्षे असे मृतकाचे नाव असून तो जाम तुकुम येथील रहिवासी आहे. कामावर तो मजुर म्हणून जात होता यात काल तो कामावर जातो म्हणून निघाला पण रात्रो घरी परत आला नसल्याने त्याची शोधाशोध केली असता तो मिळाला नाही तर आज पुन्हा शोधले असता तो शेतातील जंगलात रस्त्याच्या कडेला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला याची माहिती पोंभुर्णा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले असून पुढिल तपास पोंभुर्णा ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश बोरकुटे,संतोष येंनगंदेवार, हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here