चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह मिळाला.

0
559

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह मिळाला.

सुशी दाबगावं जंगल परिसरातील घटना

मूल प्रतिनिधी

सावली तालुक्यातील सोनापूर गावातील 22 वर्षीय युवक राकेश प्रभाकर बावणे हा चार दिवसांपूर्वी बाहेर जाऊन येतो अस सांगून घराबाहेर गेला पण त्या दिवशी घरी परत न आल्याने ,घरच्यांनी त्याचा शोधा शोध सुरू केला परंतु 2 दिवस त्याचा पत्ताच लागला नाही.मात्र तो स्वतःच्या दुचाकीवर चिरोली परिसरात गेल्याची माहिती मिळताच घरच्यांनी पोलिसांना कळवून शोधा शोध सुरू केला असता आज सकाळी त्या युवकाचा मृतदेह सुशि दाब गावं जंगल परिसरात झाडाला फाशी लागलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे गाव परिसरात खळबळ माजली असून ही आत्महत्या की हत्या अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र या प्रकरणात संशय वाटत असून पोलीस तपास करणार असल्याचे समजते . गावातील चांगला होतकरू युवक चा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच सर्वत्र गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here