नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत कृषि अधिकाऱ्यांची गावात प्रक्षेत्र भेट व पाहणी

0
598

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत कृषि अधिकाऱ्यांची गावात प्रक्षेत्र भेट व पाहणी

वणी : जागतिक बैंक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत वणी तालुक्यातील नवरगाव येथे उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा श्री जगन राठोड यांनी दिनांक ५ जुलै २०२१ ला भेट दिली, भेटी दरम्यान त्यांनी प्रकल्पाअतर्गत राबविण्यात आलेल्या विविध बाबीची पाहणी केली. सर्वप्रथम मा दुर्गा स्वयं सहायता महिला बचत गटा मार्फत स्थापण होणा-या अन्न प्रक्रिया युनिट बाबी अंतर्गत प्रकल्प स्थळाची पाहणी केली व गटातील महिला शेतक-यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर रब्बी हंगाम २०२० मधील पिक स्पर्धा हरभरा पिकामधील जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळालेले शेतकरी श्री अविनाश पावडे यांच्या शेतातील सरी वरंबा पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली व सध्याची पिक परिस्तिथी व कीड नियंत्रणाबाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ट्रक्टर व बी बी एफ यंत्राचा अनुदानित लाभ घेतलेले लाभार्थी अरुण पवार यांच्या यंत्राची पाहणी केली व उपस्थित शेतक-यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत जास्तीत जास्त बाबीचा लाभ व फळबाग लागवड करण्याचे आवाहन केले त्या प्रसंगी गावचे सरपंच श्री मोरेश्वर वासेकर, तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री सुशांत माने, मंडळ कृषी अधिकारी वणी श्री आनंद बदखल, मंडळ कृषी अधिकारी कायर श्री पवन कावरे, पोकरा चे प्रकल्प सहायक श्री निलेश जुमळे, कृषी पर्यवेक्षक श्री देवेंद्र पाचभाई, आत्माचे बिटीएम श्री धम्मपाल बन्सोड, कृषी सहायक कु.ज्ञानेश्वरी बंडगर, श्री ललित कायंदे, समूह सहायक निलेश वर सह गावातील शेतकरी महिला गटातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here